यवतमाळ  : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा अनुभव पुसदवासीयांनी घेतला आहे. अडकलेला पतंग काढण्यासाठी  तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या स्वप्निल विजय  झंगरे या सात  वर्षांच्या मुलाचा तोल जाऊन तो खाली पडला तो थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या मित्रांच्या अंगावर. यामुळेच स्वप्निलचे प्राण वाचले.

चौबारा चौकात  राहणाऱ्या अतुल रेवणवार यांच्या तीन मजली घरावर स्वप्निल व त्याचा मित्र अमोक तगडपल्लेवार याचा पतंग अडकला होता. तो काढण्यासाठी दोघे गेले होते.

अमोक खाली रस्त्यावर थांबला होता. स्वप्निल तिसऱ्या मजल्यावर गेला असता त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला आणि अमोकच्या अंगावर पडला. विशेष म्हणजे, स्वप्निल आणि अमोक यांना अजिबात इजा झाली नाही.