News Flash

घरगुती वादातून ‘त्याने’ केला भावाच्या बायकोवर गोळीबार

दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. सुषमा सुनील हुबाळे, आणि सानिका सुनील हुबाळे अशी जखमी झालेल्या मायलेकींची नावे आहेत.

सांगली जिल्हातील पलूस तालूक्यामध्ये घरगुती वादातून दिरानेच आपल्या भावजयीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने केलेल्या हल्ल्यामध्ये महिलेसह तिची अकरा वर्षाची मुलगी देखील जखमी झाली आहे. रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. सुषमा सुनील हुबाळे, आणि सानिका सुनील हुबाळे अशी जखमी झालेल्या मायलेकींची नावे आहेत. घरातील किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलाणारा आरोपी शशिकांत मारुती हुबाळे भावजयी आणि पुतणीला जखमी करुन फरार झाला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दरम्यान,  घटनेच्या ठिकाणी तपास करत असताना पोलिसांना दोन दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. ही घटना नक्की कोणत्या कारणावरुन घडली याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दिराने भावजयीवर केलेल्या गोळीबारानंतर परिसरात खळबळ माजली आहे. घरातील भांडणातील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा देखील रंगत आहेत. या वादामध्ये वेगळी काही कारणे आहेत का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2016 7:09 pm

Web Title: man fired on brother wife
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांनी केले कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
2 इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून परभणीतून एकाला अटक
3 गोंदियात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारातील पाचही आरोपींना अटक
Just Now!
X