News Flash

मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

या संदर्भातील तक्रार ही वैजापूर पोलीस ठाण्यात १८ जानेवारी २०१४ रोजी पीडित मुलीने हजर राहून दिली होती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

औरंगाबाद : नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने बाहेरगावी पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व दुसऱ्याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी शुक्रवारी सुनावली.

पीडित मुलगी ही व आरोपी संतोष वाघ व दिलीप कचरू डमाळे हे दोघेही वैजापूर तालुक्यातील धांदलगाव येथील रहिवासी आहेत. या संदर्भातील तक्रार ही वैजापूर पोलीस ठाण्यात १८ जानेवारी २०१४ रोजी पीडित मुलीने हजर राहून दिली होती. पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार ती २३ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मधल्या सुटीत दुपारी जेवणासाठी घरी आली. जेवण करून शाळेत जात असताना संतोष उत्तम वाघ व त्याचा मित्र दिलीप डमाळे हे दोघे दुचाकीवरून जवळ आले व तुला शाळेत सोडतो म्हणत बळजबरीने बसवून औरंगाबाद येथे नेले. तेथील बसस्थानकावर दिलीप डमाळे याने संतोष व पीडितेस शेगाव येथे जाणाऱ्या एसटीमध्ये बसवले. शेगावातून पुढे अकोला येथे नेले. तेथे १७ जानेवारी २०१४ पर्यंत पीडितेवर अत्याचार केला. १८ जानेवारी रोजी अकोला येथून जालना येथे आणले. जालन्यातून रेल्वेने रोटेगावकडे येत असताना संतोष वाघ हा औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उतरला.

पीडितेस एकटे सोडून दिले. पीडित मुलगी सरळ रोटेगाव रेल्वे स्टेशनवर उतरली व तेथून वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेच्या संदर्भात तक्रार दिली. त्यावरून बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली संतोष वाघ व दिलीप डमाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैजापूरच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रतिमा बिरारी यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्षही महत्त्वाची ठरली. तसेच वैद्यकीय व न्यायवैद्यकीय अहवालही महत्त्वाचा ठरल्याचे सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी सांगितले. साक्षीपुराव्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी संतोष उत्तम वाघ (वय २५) यास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर आरोपी दिलीप कचरू डमाळे (वय २६) यास ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील कैलास नारायणराव पवार यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:25 am

Web Title: man get 10 year punishment for sexually abusing 15 year old school girl
Next Stories
1 अर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान
2 विदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली
3 ‘कचरानगरीत’ निवडणुकीसाठी बांधणी
Just Now!
X