सोलापूर : स्वत:च्या घरासमोर नारळ आणि लिंबू ठेवून करणी-भानामती करण्याच्या संशयावरून एका महिलेसह पाच जणांनी मिळून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दादाराव ज्योतिबा कांबळे (वय ५०) हा गंभीर जखमी झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी येथे सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

जखमी दादाराव कांबळे याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रघुनाथ कांबळे, महादेव कांबळे, सावित्रा कांबळे आदी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जखमी दादाराव कांबळे याच्या घरासमोर कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी नारळ व लिंबू आणून टाकले होते. परंतु हे कृत्य दादाराव यानेच केला आणि त्यामागचा हेतू करणी-भानामती करण्याचा आहे, असा संशय घेऊन रघुनाथ कांबळे, सावित्रा कांबळे व इतरांनी दादाराव याजबरोबर जोरदार भांडण काढले. या भांडणातच या सर्वानी त्याच्यावर सत्तूर, विळा आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात शरीरावर ठिकठिकाणी वार झाले आहेत. त्याला गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

engineer man killed his father in chhatrapati sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : अभियंता मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Five thousand prisoners who were released on parole during the Corona period are outside the prison
करोनाकाळात ‘पॅरोल’वर सुटलेले पाच हजार कैदी कारागृहाबाहेरच
three year old boy dies after balloon gets stuck in throat in Ichhalkaranji
फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

सांगोल्यात घरफोडी

सांगोला तालुक्यातील अचकदाणी गावात रात्री घरासमोर उघडय़ावर झोपणे एका कुटुंबीयांस महागात पडले.

महादेव कोंडिबा कदम हे रात्री कुटुंबीयांसह घरासमोर झोपले होते. तेव्हा संधी साधून चोरटय़ांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल संच असा मिळून सुमारे दोन लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ६० हजारांची रोकड आदी माल चोरून नेला. सांगोला पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.