26 October 2020

News Flash

किरकोळ वादातून बहिणीचा खून

मोबाईल खेळण्याच्या वादातून ही घटना झाल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

नगर: किरकोळ वादातून मोठय़ा भावाने लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शहराच्या केडगाव उपनगरातील शाहूनगर भागात आज, शनिवारी रात्री साडेसात—आठच्या  सुमा घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. खून झालेली मुलगी ९ वर्षांची तर तिची हत्या करणारा भाऊ १२ वर्षांंचा असल्याची माहिती मिळाली. खून केल्यानंतर हा लहान मुलगा घरातील लॅपटॉप व पैसे घेऊन पळून गेला होता.

ही दोघे भावंडे घरात एकटीच होती, आई—वडील भाडय़ाचे नवीन घर पाहण्यासाठी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्याकडे गेले होते. घरात टीव्हीचे चॅनल बदलण्याच्या कारणातून किंवा मोबाईल खेळण्याच्या वादातून ही घटना झाल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत होते.

कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर भाऊ घरातील लॅपटॉप व रोख रक्कम घेऊन पळून गेला. नंतर तो पुणे बावळण रस्त्यावरील रॉयल हॉटेल येथे गेला. हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे त्याने नोकरी मागितली. व्यवस्थापकाने अधिक चौकशी केली असता, घरच्यांनी मारहाण केली म्हणून आपण पळून आल्याचे त्या मुलाने सांगितले. परंतु व्यवस्थापकाने त्या मुलाच्या वडिलांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. वडील लगेच तपोवन रस्त्यावरून शाहूनगरमध्ये आले. त्यांनी घरात मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी या बारा वर्षांच्या मुलाचा ताब्यात घेतल्याचे समजले. या मुलांचे वडील एमआयडीसीमध्ये एका फोर्जिग कंपनीत काम करतात. हे कुटुंब मूळचे उस्मानाबादकडील असल्याचे समजले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:17 am

Web Title: man murder sister over minor dispute zws 70
Next Stories
1 रद्दीतून वंचितांची दिवाळी साजरी होणार
2 पेण बँकेच्या विलिनीकरणासाठी पुन्हा प्रयत्न
3 रत्नागिरीत ८०० चाचण्यांमध्ये १८ करोनाबाधित
Just Now!
X