27 February 2021

News Flash

पत्नी व तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी शेतात गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा गळा दाबून खून केला आणि स्वतः गळफास घेतला.

अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका युवकाने पत्नीसह तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका युवकाने पत्नीसह तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश बंदीछोडे (वय ३६) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नीचे नाव अंदवा (वय २५) आणि मुलीचे वेदिका (वय ३) असे नाव आहे.

सतीश हा गेल्या काही वर्षांपासून पुण्यात नोकरीसाठी राहत होता. सोमवारी रात्री तो पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी शेतात गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा गळा दाबून खून केला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उशिरा उघडकीस आली. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरगुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. घटनेची अक्कलकोट पोलिसांत नोंद झाली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 1:31 pm

Web Title: man murdered wife and three year old girl and committed suicide
Next Stories
1 जाणून घ्या, कोण होते जे. डे?, छोटा राजनने कशी केली त्यांची हत्या?
2 जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप
3 पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने चार महिन्याच्या बाळाला आपटले जमिनीवर
Just Now!
X