26 November 2020

News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी

नेवासे शहराजवळ ७ एप्रिल २०१८ रोजी ही घटना घडली.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

नगर : नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायालयाने नेवाशातील तरुणाला १० वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. जिल्हा व विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयूरेश नवले यांनी काम पाहिले.

नेवासे शहराजवळ ७ एप्रिल २०१८ रोजी ही घटना घडली. मुलगी आजोबांच्या घरी राहत होती. तेथे या कुटुंबाच्या नात्यातील तरुण आला व त्याने ‘मुलीसाठी सोयरीक आली आहे, पाहुणे पाहायला आले आहेत, मुलीला घरी न्यायचे आहे,’ असे सांगून मोटरसायकलवर बसवले. नंतर रस्त्यात निर्जनस्थळी, उसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला व तिला पुन्हा गावातील स्टॅण्डवर आणून सोडले.

मुलीने याची माहिती आजोबा व विधवा आईला दिली. त्यानंतर भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासे पोलिसांनी बलात्कार व बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे यांनी तपास केला. खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील नवले यांना सरकारी वकील एम. पी. गीते, भैरवी अधिकारी सुभाष हजारे व महिला पोलीस नवगिरे यांनी साहाय्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 1:05 am

Web Title: man sentenced to 10 years in jail for raping minor zws 70
Next Stories
1 खासदारांना खंडणीच्या धमकीनंतर पोलिसांकडून तपासाला गती
2 भाजपावर टीका करणं, ही संजय राऊत यांची ड्युटी आहे – चंद्रकांत पाटील
3 चंद्रकांत पाटील यांनी शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसला दिलं चॅलेंज, म्हणाले…
Just Now!
X