26 February 2021

News Flash

महाराष्ट्रात मांत्रिकाच्या सांगण्यावरुन गुप्त खजिन्यासाठी ५० दिवस पत्नीचे हाल

गुप्त खजिना मिळवण्यासाठी पतीने पत्नीचे तब्बल ५० दिवस खाण्यापिण्याचे हाल केले.

गुप्त खजिना मिळवण्यासाठी पतीने पत्नीचे तब्बल ५० दिवस खाण्यापिण्याचे हाल केले. तिला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ अत्यल्प जेवणावर ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पती आणि त्याचे कुटुंबिय पत्नीचे हाल करत होते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

जेवणाअभावी महिलेची उपासमार सुरु होती. ऑगस्ट २०१८ मध्ये महिलेचे लग्न झाले. पत्नीला उपाशी ठेवले आणि तिने काही विधी केले तर तुम्हाला गुप्त खजिना सापडेल असे एका मांत्रिकाने महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे या महिलेचे हाल सुरु होते. लग्नाच्या पहिल्या दिवशीच कासवावर काही विधी करण्यासाठी कुटुंबियांकडून महिलेवर जबरदस्ती करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले.

तिचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. ५० दिवस तिचे खाण्यापिण्याचे हाल करण्यात आले. तिला अत्यंत अल्प जेवण दिले जात होते. या दरम्यान मध्यरात्री पावणेतीन ते सकाळ होईपर्यंत तिला पूजापाठ करण्यासाठी बसवले जायचे. विधी करताना तिने एखादी चूक केली तर सासू-सासरे तिला मारहाण करायचे. तिने तिच्या आई-वडिलांना काही सांगू नये यासाठी तिचा मोबाइल फोनही काढून घेतला होता.

वडिलांना संशय आल्यानंतर ते तिच्या घरी पोहोचले. तेव्हा तिची अवस्था पाहून त्यांना जबर धक्का बसला. ते तिला आपल्यासोबत घरी घेऊन आले. तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजला असे या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीसाने सांगितले. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेचा पती आणि मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 4:42 pm

Web Title: man starve wife for 50 days hidden treasure chandrapur district of maharashtra dmp 82
Next Stories
1 यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार
2 रायगडमध्ये वर्षा सहलीचा पहिला बळी, कल्याणमधील पर्यटक तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू
3 विधानसभेसाठी भाजपाची तयारी सुरू; 21 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक
Just Now!
X