अलिबागमधील पर्यटन उद्योगाला चालना मिळावी आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या मांडवा शाखेकडून मांडवा किहीम फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २९ एप्रिल ते २ मे दरम्यान किहीम येथील राजा शिवछत्रपती क्रिडांगणावर होणाऱ्या या महोत्सवात रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे अशी महिती फेस्टीव्हलचे अध्यक्ष नितीन धर्माधिकारी यांनी दिली. संस्थेच्या वतीने यापुर्वी अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नेत्र तपासणी, मोतीिबदू शस्त्रक्रिया, रक्तदान, आरोग्य तपासणी स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. समाजपयोगी उपक्रम राबविताना अलिबाग तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.  फेस्टिव्हल मध्ये विविध उत्पादनाच्या विक्रीसाठी १५० स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात पांढरा कांदा, आंबा, काजू, आवळे, चिंच, फणस, करवंद, जांभूळ आदींसह मत्स्यउत्पादने, बचत गटांनी तयार केलेली उत्पादने यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आरोग्यमंत्री दिपक सावंत आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत २९ मेला महोत्सवाचे उद्घाटन होणार असून गृहराज्यमंत्री राम िशदे समारोप सभारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे. फेस्टीव्हलच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

अच्युत गोडबोले यांचे सुलेखन सादरीकरण, देवव्रत जातेगावकर यांचा कुकरी शो, ब्रास बँड स्पर्धा, ‘मराठी पाऊल पडते पुढे’सारख्या कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे अशी माहिती नितीन अधिकारी यांनी दिली. यावेळी सुबोध राऊत, मानसी चेऊलकर, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष आमित शिरगावकर आदी उपस्थित होते.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…