News Flash

पंढरपूर : आमराईत नटली विठ्ठल-रखुमाई…

देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे

फोटो सौजन्य - श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

-मंदार लोहोकरे

संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात करण्यात आली आहे.

रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या 3100 हापूस आंब्याने  श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत आहे. देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे.

श्री विठ्ठलाप्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी श्री विठ्ठल भक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल) अजय सालुखे (उद्योगपती पुणे), उमेशभाई भुवा (सांगली) दीपकभाई शहा (सांगली) सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्याची पूजा अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 8:34 am

Web Title: mango decoration in vitthal rakhumai temple msr 87
Next Stories
1 जळगाव, अमळनेरसह पाच शहरांत टाळेबंदी संपेपर्यंत दुकाने बंद
2 जळगाव जिल्ह्यात नव्याने ३२ करोना रुग्ण
3 धुळ्यात एका दिवसात करोनाचे १८ रूग्ण
Just Now!
X