रायगडच्या माणगाव तालुक्यातील विळे भागात औद्योगिक वसाहतीत क्रिपझो इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात १७ जण जखमी झाले. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या कंपनीत ऑक्सिजनचे सिलेंडर तयार केले जातात. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत आग लागली. यात कामगार भाजले गेले. हा स्फोट नेमक्या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आमदार गोगावलेंची भेट

घटनेचे वृत्ते कळताच महाडचे आमदार भरत गोगावले यांनी माणगावच्या  उपजिल्हा रूग्णालयाला भेट देवून जखमींची विचारपूस केली . जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी नवी मुंबईत पाठवण्यादसाठी हालचाली केल्याग . हा स्फो ट नेमका कसा झाला , त्यामागची कारणं काय याचा शोध तपास यंत्रणांनी घेतला पाहिजे तसेच त्याई ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यकवस्था  ठेवण्यापत आली होती का , कंपनी व्यईवस्थापनाची भूमिका काय आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यायत यावी अशी मागणी गोगावले यांनी यावेळी केली

जखमींची नावे 

या अपघातात (१) आशिष (२) सुनील रेगोटे वय ३६ ,(३) शुभम जाधव वय २३ (४) सूरज उमटे वय २३, (५) किशोर कारगे  वय ३०, (६)चेतन कारगे वय २८, (७) राकेश हळदे वय ३०, (८) कैलास पडावे वय ३२, (९) रूपेश मानकर वय २५, (१०) सुरेश मांडे वय २४, (११) प्रसाद नेमाणे वय २३, (१२) वैभव पवार वय २६, (१३) राजेश जाधव वय २८, (१४) आकाश रक्ते वय २० , (१५) मयुर तामणकर वय २४ ,(१६) रजत जाधव वय २३ (१७) प्रमोद म्हस्के वय २३, (१८) सुनील पाटील हे जखमी झाले आहेत.  यातील गंभीर जखमींना अति तातडीने मुंबईत हलविण्यात आले आहे.