25 April 2019

News Flash

नांदगावमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार

नांदगावमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या महिलेची मुलगी आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी पीडित महिला बोयेगाव येथे गेली.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

सासूला घरी सोडण्याच्या बहाण्याने सासूरवाडीला गेलेल्या जावयाने सासूवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना नांदगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम जावयास पोलिसांनी अटक केली आहे.

नांदगावमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या महिलेची मुलगी आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी पीडित महिला बोयेगाव येथे गेली. दिवसभर मुलीकडे थांबून पीडित महिला संध्याकाळी घरी परतण्यासाठी निघाली. त्यावेळी जावयाने घरी सोडतो असे सांगितले. आपल्या दुचाकीवरून जावयाने संध्याकाळी सासूला जोंधळेवाडी फाट्याजवळ सोडले. घरी आल्यावर पीडित महिला तिच्या वृद्ध वडिलांना जेवण देऊन झोपण्यासाठी निघून गेली. रात्री १० च्या सुमारास दरवाजा लोटण्याचा आवाज आला. महिलेने दरवाज्याकडे धाव घेतली असता तिला जावई घरात येताना दिसला. यानंतर जावयाने सासूवरच बलात्कार केला, तसेच तिला मारहाण देखील केली.  मारहाणीनंतर जावई मोटारसायकलने निघाला. जावई आपल्या मुलीला मारहाण करेल या भीतीने सासू त्याच्या मागे पळत गेली असता शास्त्रीनगरजवळील वन विभागाच्या क्षेत्रात जावयाने सासूला पुन्हा मारहाण केली. स्थानिक नागरिक तेथून जात असताना मारहाणीचा प्रकार पाहून त्यांनी सोडवणूक केली. घडलेला प्रकार पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिराने जावयाविरुध्द तक्रार देण्यात आली. शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

First Published on April 16, 2018 7:01 pm

Web Title: manmad woman files rape complaint against son in law in nandgaon