20 January 2021

News Flash

मनुष्यबळाअभावी रुग्णालय आजारी!

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त; रुग्णांचे हाल

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त; रुग्णांचे हाल

डहाणू : डहाणूच्य उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा असून अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना वैद्यकीय अधिकारी नसल्याने गुजरात किंवा मुंबई येथे नेण्यात येत आहे.

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण १४ पदे मंजूर आहेत. त्यात बालरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ ही महत्वाची पदे रिक्त आहेत. बाँडेट अधिकाऱ्यांची एक वर्ष कराराने नेमणूक करून उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे सामान्य गरीब लोकांना महत्त्वाच्या आजारावर गुजरात किंवा मुंबई येथे हलवण्याचा सल्ला दिला जातो.

डहाणू उपजिल्हा येथे बालरोग बालरोगतज्ज्ञ हे पद २००८पासून रिक्त आहे. हे पद अद्याप भरण्यात आलेले नाही. शल्यचिकित्सक पदे जून २०१८पासून रिक्त आहेत. ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत. स्त्रीरोगतज्ज्ञ ही मंजूर २ पदे आहेत. त्यापैकी १ पद भरले. सध्या कार्यरत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ सहा महिन्यांची प्रसुती रजा आणि तीन महिन्यांच्या बालसंगोपन रजेवर गेले आहेत. नेत्रशल्यचिकित्सा मंजूर भरलेली पदे २० जानेवारी  २०२० पासून कार्यरत आहेत. दंतचिकित्सा मंजूर पद एक पद कार्यरत आहेत. अस्थिरोगतज्ज्ञ हे विरारच्या ग्रामीण रुग्णालयात १३ सप्टेंबर २०१७पासून  प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. ़

वैद्यकीय अपघात विभागात मंजूर चार पदे भरलेली आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग तीन मंजूर पदे आहेत. सध्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांना मागील एक वर्षांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्ती देण्यात आलेले  आहे.

दर्जा रुग्णालयाचा, पण सेवा सामान्य

डहाणू येथे बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ बाहेरून मागवावे लागतात. अद्ययावत एक्सरे यंत्रे तंत्रज्ञाअभावी धूळ खात पडलेली आहेत. केवळ रुग्ण दाखल केले जातात. मात्र त्यांना उपचारासाठी मुंबई, वापी येथे तात्काळ हलवावे लागते. त्यासाठीच या रुग्णालयाचा वापर होत असलयाचा आरोप आमदार विनोद निकोले यांनी केला.

औषधां तुटवडा

जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात औषधाचा पुरवठा होतो. रुग्णालयातून बाहेरून मागणी केलेल्या औषधांचे लेखापरीक्षण गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय रुग्णालया का होत नाही, असा सवाल आमदार विनोद निकोले यांनी केला. रुग्णांना औषध उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. रुग्णांना मोफत उपचार मिळावेत म्हणून आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले. मात्र त्यांना औषधे खासगी औषधांच्या दुकानांतून विकत घ्यावी लागतात.

दोनच रुग्णवाहिका चालक

या रुग्णालयाला शासनाच्या तीन आणि दोन खासगी रुग्णवाहिका आहेत. मात्र त्यासाठी एक शासकीय आणि एक खासगी वाहन चालक आहेत. त्यामुळे या रुग्णवाहिका चालवल्या जात नाहीत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी भरती, बदल्या संचालक कार्यालयातून होतात. आम्हाला ११ महिने  कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे अधिकार आहेत. आम्ही लवकरच मुलाखती घेणार आहोत.

– कांचन वानेरे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:03 am

Web Title: many post vacant at dahanu sub district hospital zws 70
Next Stories
1 प्रदूषणामुळे २० श्वानांचा बळी!
2 रस्त्याच्या कामांमुळे दहा दिवस एसटी बंद
3 ‘सरकारने दुर्लक्ष केल्याने शाहीनबागमध्ये भयंकर प्रकार’
Just Now!
X