News Flash

दीपालींच्या पत्रातील अनेक प्रश्न अनुत्तरितच!

दीपाली यांनी त्यांचे पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे, त्यात मनीषा उईके चा उल्लेख आहे.

अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार यांना अटक झाली. पण त्यांच्या मृत्यूपूर्व पत्रांतील छळकहाणीचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दीपाली यांनी पतींना लिहिलेल्या पत्रात मनीषा उईके  या महिलेचा उल्लेख के ला आहे. ‘ती आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, तिने माझे आयुष्य बर्बाद के ले आहे’, असे लिहिले आहे. त्यामुळे मनीषा उईके  कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात आजूबाजूंच्या कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षकांचे कान भरण्यास सुरुवात के ल्याचा उल्लेख आहे, आता हे कर्मचारीही  हुडकू न काढावे अशी मागणी होत आहे.

दीपाली यांनी त्यांचे पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे, त्यात मनीषा उईके चा उल्लेख आहे. या महिलेवर दीपाली यांनी आयुष्य उध्वस्त के ल्याचा गंभीर आरोप के ला आहे. या महिलेचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे शोधून काढण्याचे आव्हान  पोलिसांसमोर आहे.

दीपाली यांनी आपल्या कामकाजाविषयी पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे. ‘उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार हे पूर्वी आपल्याशी खूप चांगले वागायचे. माझ्या कार्यक्षेत्रातील कामे सर्वात आधी पूर्ण व्हायची. जेव्हा आमचे परिक्षेत्र इतर परिक्षेत्रांच्या पुढे जायला लागले, तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षकांचे कान भरणे सुरू केले. ते इतक्या हलक्या कानाचे आहेत, की कोणत्याही गोष्टींची खात्री न करता माझ्या नावाने नोटीस काढणे त्यांनी सुरू के ले. काहीही खटकले की मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले’, असे दीपाली यांनी पत्रात म्हटले आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धेतून कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी  वनविभागातीलच काही कर्मचाऱ्यांनी हातभार लावल्याचे या पत्रातून दिसून आले आहे. त्यातच मांगिया या गावाच्या पूनर्वसन प्रक्रि येदरम्यान त्यांना ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तक्रारीचा सामना करावा लागला. यावेळी त्यांचा कोणी छळ के ला, याचा देखील तपास होणे आवश्यक असल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू के ला आहे. संबंधितांच्या जबाबातून आणखी काही माहिती बाहेर येऊ शके ल, असे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:41 am

Web Title: many questions in deepali letter remain unanswered akp 94
Next Stories
1 अनिल देशमुख यांना गृहखाते अपघाताने मिळाले
2 रेड्डींची पाठराखण करणाऱ्यांना नवनीत राणांनी खडसावले
3 महसूल मंत्री थोरात यांच्या कृतीने काँग्रेसमध्ये नाराजी!
Just Now!
X