पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवी टीका करणारे साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना नेटिझन्सनी शुक्रवारी फटकारले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा एकेरी उल्लेख करून त्याच्यावर टीका करू नये, असे मत अनेक नेटिझन्सनी व्यक्त केले. त्याचबरोबर मोदींच्या पंतप्रधान पदाची लायकी ठरवण्याचा सबनीसांना हक्क असेल, तर त्यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लायकी ठरवण्याचा हक्क आम्हा वाचकांनी बाजवावा का?, असा प्रश्नही वाचकांनी उपस्थित केला आहे.
श्रीपाल सबनीसांवर टीका करणाऱ्या लोकसत्ता वेबसाईटवरील निवडक प्रतिक्रिया…
संजय गोळे – मोदींच्या पंतप्रधानपदाची लायकी ठरवण्याचा सबनीसाना हक्क असेल तर त्यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लायकी ठरवण्याचा हक्क आम्हा वाचकांनी बाजवावा का? श्री के क्षीरसागर, अनंत कानेटकर, दुर्गा भागवत ह्यांच्या पासंगाला तरी सबनीस पुरतात का? इतिहासाचार्य वि का राजवाडेना अध्यक्षपद मिळाल नव्हतं म्हणजे ते सबनीसानपेक्षा कमी लायकीचे म्हणायचे का? माणसाने आपला वकूब समजून जगाव, हे सबनीसांना शिकवण्याची वेळ आली आहे. कावळ्याने मोर म्हणून नाचू नये…
कांचन हर्डीकर – जसं फळांनी भारलेल झाड वाकलेलं असत, तसाच ज्ञानी माणूस विनम्र होतो. सर्वसाधारणपणे लेखक हा ज्ञानी समाजाला जातो. त्याच्या भाषा आणि ज्ञान कौशल्याने तो समाजाला मार्ग दाखवत असतो. पण असे लेखक कसल्याही कुबड्या घेऊन चालत नाहीत त्यातल्यात्यात राजकारणाच्या. असो…..
पद्मिनी दिवेकर – श्रीपालजी आमच्यावर असलेल्या संस्कारांमुळे तुम्हाला संबोधित करताना जी लावले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख करताना त्यांना योग्य संबोधन वापरण्याचे भान तुम्हाला नाही. साहित्यिक म्हणवून घेणाऱ्याने एवढे भान बाळगावे ही किमान अपेक्षा आम्ही ठेवू शकतो. दुसरे म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांना भारतीय लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिले आहे याचा विसर तुम्हाला पडला असावा असे दिसते. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या बद्दल बोलत आहात तो अपमान त्या सगळ्या लोकांचा आहे ज्यांनी त्यांना निवडून दिले आहे.
हेमा – खूपच फटकळ स्वभावाचा माणूस आहे हा… काही लोक तर पंतप्रधानांना कस्पटासमान समजतात, त्यांचा आदर करीत नाही… धिक्कार आहे अशा लोकांचा…
आनंद – disgusting. get popularity on your own. why are you using name of Modi. No body knows who is this fellow. just attracting popularity. very cheap person
विनायक सोहोनी – एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. आपण ज्या प्रमाणे मोठे आहात तसेच नरेंद्र मोदी कदाचित वयाने नसतील, पण एका महान देशाचे पंतप्रधान आहेत.
श्रीनिवास – भाषण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन सबनीसांनी जी मुक्ताफळे उधळली ती साहित्यिकाला शोभणारी नाही. आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. मोदींचे नाव काढले की त्यांना गोधरा आठवते. पण त्याच गोध्र्याला ५५ निरपराध कारसेवकांना जाळल्याची घटना आठवत नाही हे दुर्दैव्य आहे. मोदी धाडसी आहे त्यांच्यावर संघाचे संस्कार आहे म्हणूनच. संघ संस्काराचा पाया सकारात्मक आहे. म्हणूनच मोदी पाकिस्तानात म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊ शकले. सुरक्षित जागी बसून मुक्ताफळे उधळणाऱ्या येऱ्या गबाळ्याचे ते काम नाही.
पांडुरंग भणगे – काय ही भाषा! ही भाषा बघितल्यावर स्वर्गात असलेले राम गणेश गडकरी, ह ना आपटे, वि स खांडेकर, कुसुमाग्रज प्रभृती दिग्गज, ‘अशी भाषा ऐकण्याचे दुर्भाग्य आपणावर आले नाही हे केवढे मोठे भाग्य’ असे म्हणत असतील. आचार्य अत्रे तर म्हणाले असतील की ‘असा आचरट माणूस गेल्या पंचवीस हजार वर्षात झाला नाही. त्याच्या पृष्ठभागावर पायाचा ठसा उमटवला पाहिजे.’
.. तर मोदींसाठी श्रद्धांजली वाहावी लागली असती

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
PM Narendra Modi Arun Varnekar
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतःचे बोट छाटून देवीला केले अर्पण; कार्यकर्त्याचा अघोरी प्रकार
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”