News Flash

पुण्यात मराठा आरक्षण परिषदेला सुरवात; तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित

राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेला मराठा समाजातील मान्यवर, तज्ज्ञ उपस्थित आहेत.

पुण्यात मराठा आरक्षण परिषदेला सुरवात; तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार) पुण्यात खासदार उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषदेला सुरुवात झाली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार) पुण्यात खासदार उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेला मराठा समाजातील मान्यवर, तज्ज्ञ उपस्थित आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून राज्यातील मराठा समाजातील नागरिक रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी जाळपोळच्या घटना देखील घडल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येच्या घटना घडत आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या सर्व घटना लक्षात घेता, दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी पुण्यात मागासवर्ग आयोगाच्या समितीच्या अध्यक्षाची भेट घेऊन तातडीने अहवाल करून सरकारला पाठवावा अशी मागणी देखील केली होती. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका देखील केली होती.

त्याचवेळी पुण्यात मराठा आरक्षण परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या घोषणेनंतर आज पुण्यात उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाची पुढील दिशा काय असणार यासाठी मराठा आरक्षण परिषदेला सुरुवात झाली. आता या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 3:24 pm

Web Title: maratha aarkshan parishad maratha reservation parishad pune mp udayanraje bhosale
Next Stories
1 Friendship Day 2018 : शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले; न बोलताही जपलीये त्यांनी १२ वर्षांची मैत्री
2 मराठा आरक्षण : आंदोलनाची पुढची दिशा ठरणार, राज्यभरात बैठका
3 पिंपरीत महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे विजयी