मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे, या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीत झाल्याचे समजते आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसींवर योग्य ती पक्रिया करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या मागील दोन दिवसात तीन बैठका झाल्या. उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं जावं या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणााठी मागासवगर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. य आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली. या सगळ्या शिफारसी राज्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या आधी झालेल्या बैठकीत स्वीकराल्या अशीही माहिती समजते आहे. मात्र मराठा समजाला किती अरक्षण द्यायचं यासाठी द्यायचं यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. यानंतर आरक्षणासंदर्भातले विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होते आहे. राज्यभरात मराठ्यांचा हुंकार मूक मोर्चाच्या रुपानेही दिसला. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. आंदोलन करू नका जल्लोषाची तयारी करा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र आता खरोखरच १६ आरक्षण दिलं जाणार? की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 3:45 pm