महिलांचाही लक्षणीय सहभाग

कोपर्डीतील अत्याचाराच्या निषेधासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे रविवारी वाशिममध्ये मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी भरपावसात मोर्चात सहभागी झालेल्या लाखोंच्या जनसमुदायाचे विराट दर्शन घडले. ऐतिहासिक व अभूतपूर्व निघालेल्या मोर्चात आबालवृद्धांसह महिलांचा स्वयंस्फूर्त सहभाग होता.

या मोर्चाची येथे गेल्या १५ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून बाजार समितीच्या मैदानात लाखोंच्या संख्येने नागरिक जमले. दुपारी १२ वाजता येथून शिस्तबद्ध मोर्चा निघाला. गर्दी किंवा गोंधळ उडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली होती. महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्याíथनींची मोर्चात बहुसंख्येने उपस्थिती होती. बाजार समितीच्या मदानावरून राजनी चौक, शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौक माग्रे जिल्हा परिषद मदानावर पोहोचला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला १० लाखांची आíथक मदत द्यावी, आदी प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यानंतर जिजाऊ वंदना, तसेच मोर्चात सहभागी बांधवांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीतानंतर मोर्चाचा समारोप झाला. पाऊस सुरू असतांनाही नागरिक छत्र्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात मराठा समाजातील लाखो नागरिकांसह जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते,  अन्य लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. वकील आपल्या गणवेशासह मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवी संघटनांनी केली होती. सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यावेळी  अपप्रवृत्तीबद्दल नि:शब्द रोष दाखलवा. हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी मराठा समाजातील युवकांच्या २३ समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मोर्चात सुमारे २० हजार फलके, २० हजार काळे झेंडे होते, ७ हजार पुरुष व १ हजार महिला स्वयंसेवक, २० लाख पाण्याचे पौच, मोर्चा मार्गवर २२५ ध्वनिक्षेपके, १० स्क्रिन्स लावण्यात आले होते. हा मोर्चा शांततेने, आपसातही न बोलता काढण्यात आला. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चात गर्दी होत असल्याने सर्व ठिकाणी पाìकगची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलेला होता.