21 September 2020

News Flash

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयक आणि अण्णा हजारे यांच्यात उद्या बैठक

संग्रहित

लोकपाल, लोकायुक्त, स्वामी नाथन आयोग लागू करावा. या अनेक प्रश्नसह मागील आठवड्याभरापासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषणाला बसले आहे. याकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष असून त्या पार्श्‍वभूमीवर उद्या राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थिती बैठक घेतली जाणार आहे. त्यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चाचे राज्याचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनानुसार पुढील लढा उभारला जाणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांताराम कुंजीर की, अण्णा हजारे हे आठवड्याभरापासून उपोषणास बसले असून त्यांच्या तब्येतीवर परिणाम देखील झाला आहे.

मात्र हे सरकार या उपोषणकडे गांभिर्याने पाहत नाही. ही निषेधार्थ बाब असून अण्णाची भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेऊन लोकपाल सह अनेक प्रश्न मार्गी लावावे . मात्र अद्याप ही त्या प्रकारची पावले भाजपकडून उचलली जात नाही ही निषेधार्थ बाब असल्याचे सांगत भाजपवर त्यांनी निशाणा साधला. तसेच आमचा अण्णाच्या उपोषणास पाठिंबा आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मूक मोर्चाच्या राज्यातील समन्वयकाची राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थिती बैठक घेऊन मराठा क्रांती मूक मोर्चा त्यांच्या मार्गदर्शना नुसार पुढील लढा उभारणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:09 pm

Web Title: maratha kranti morcha saport anna hajare
Next Stories
1 लोकसभेपूर्वी भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला, मेघे- खा. तडस यांच्यात जुंपली
2 इंदापूर तालुक्यात विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी
3 आनंद तेलतुंबडे यांना तूर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
Just Now!
X