News Flash

‘मराठा क्रांती मोर्चा’कडून राज्य सरकारला इशारा…

'त्या' तरुणाला शहीद घोषित करण्याची मागणी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कायगाव टोक येथे पुलावरुन नदीत उडी मारलेल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात ‘मराठा क्रांती मोर्चा’कडून राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या तरुणाचे शव ताब्यात घेणार नाही आणि त्याचे अंत्यसंस्कार विधी करणार नाही, असा इशारा ‘मराठा क्रांती मोर्चा’ने राज्य सरकारला दिला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला देण्यात आलेल्या प्रतिक्रियेत मराठा क्रांती मोर्चाकडून काही मागण्या करण्यात आल्या. त्यात काकासाहेब शिंदे या जलसमाधी घेतलेल्या तरुणाला शहीद घोषित करा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. यासह त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात यावी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाच्या भावाला सरकारी नोकरीत रुजू करून घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने कायगाव टोक येथे पुलावरुन नदीत उडी मारली. त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या संबधी स्थानिक प्रशासनावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील मेगा भरती रोखण्यात यावी, अशीही मागणी केली गेली आहे.

दरम्यान, काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले होते.

याशिवाय, सोमवारी रात्री आठच्या सुमारास काही तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 1:40 am

Web Title: maratha kranti morcha state government warning gangapur incident 2
Next Stories
1 दूध अनुदानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
2 ‘मिरज पॅटर्न’ला यंदा धक्का?
3 घोटाळ्याचा आकडा ४९९ कोटींपर्यंत
Just Now!
X