News Flash

मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करा: हायकोर्टाचे निर्देश

याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करुन द्यायची, यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.  याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करुन द्यायची, यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बुधवारी किंवा गुरुवारी हा अहवाल सादर केला जाईल. यानंतर सोमवारी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करुन द्यायची, यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे.

६ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. मेगाभरतीवरील स्थगिती तूर्तास उठवण्याची राज्य सरकारची मागणी हायकोर्टाने फेटाळली. ६ फेब्रवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती कायम असेल.

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल काय होता?

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी अहवाल तयार केला होता. राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के असलेल्या मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासाठी आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केली होती. या आधारे विधिमंडळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा मंजूर करण्यात आला होता. विधिमंडळातही हा संपूर्ण अहवाल सादर करण्यात आला नव्हता. राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल विधिमंडळात सादर केल्यास त्यातून अनेक मुद्दे व वाद निर्माण होतील, असे सरकारचे म्हणणे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 12:33 pm

Web Title: maratha reservation bombay high court state backward class commission report maha government
Next Stories
1 मेळघाटात पहिल्यांदाच आदिवासी- वनविभागात सशस्त्र संघर्ष, जाणून घ्या कारण
2 गोंदियात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
3 चमत्काराने बेपत्ता व्यक्ती शोधण्याचा दावा; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Just Now!
X