19 January 2021

News Flash

जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतोय, पण आता… : छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षणाबाबत बोलताना व्यक्त केली खंत

संग्रहित

“मराठा समाजासाठी मी माझा जीव धोक्यात घालून फिरत आहे. सरकारला काय सांगायचं? आता मी बोलून थकलो आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत त्वरित पावलं उचलावीत एवढीच माझी विनंती आहे, आता मी थकून गेलो आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. “मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

आणखी वाचा- मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली

“मराठा आरक्षणाबाबत अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती आहे. मी थकलो आहे. थकून गेलो आहे,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं असं मी अनेक दिवसांपासून सांगत आहे. दोन दिवसांपूर्वी माझं अशोक चव्हाण यांच्याशीदेखील बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्यांना उपसमितीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. तीदेखील सध्या झालेली दिसत नाही. याचंच आपल्याला आश्चर्यही वाटत असल्याचं ते म्हणाले.

आणखी वाचा- घटनापीठापुढेच आम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे- अशोक चव्हाण

मराठा समाजाला गृहित धरताय का?

“सुनावणीदरम्यान सरकारी वकील कुठे आहेत असा सवाल न्यायालयाकडून करण्यात येतो. त्यावेळी ते उपस्थित नसणं हे दुर्देवी आहे. मराठा समाजाला अशा पद्धतीनं गृहित धरायला लागले आहेत का ? आमचा सरकारी वकिलांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्याबद्दल कोणतंही दुमत नाही. आपली बाजू मांडणं महत्त्वाचं आहे,” असंही संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षण हा विषय गांभीर्यानं घ्यावा, त्यातील बारकावे समजून घ्यावे ही यापूर्वीपासून सरकारला सांगत आलो आहे. काही तांत्रिक घोळ झाल्याचं माझ्या कानावर आलं आहे. परंतु पुढील सुनावणीला कोणी उपस्थित न राहिल्यास चुकीचा संदेश जाईल. जी कोणतीही चूक झाली ती ताबडतोब दुरूस्त करण्यात यावी असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:09 pm

Web Title: maratha reservation chatrapati sambhajiraje supreme court maharashtra government statement jud 87
Next Stories
1 आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप
2 खासदार सुनिल तटकरे यांना करोनाची लागण
3 मुंबईत सेवा देऊन परतलेल्या सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
Just Now!
X