21 September 2020

News Flash

मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन काळातच तोडगा?

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातच व्हावे आणि मराठा समाजास आरक्षण मिळावे अश्या मागण्या करीत सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवन परिसर मंगळवारी दणाणून सोडला.

| December 19, 2012 07:21 am

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातच व्हावे आणि मराठा समाजास आरक्षण मिळावे अश्या मागण्या करीत सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवन परिसर मंगळवारी दणाणून सोडला. त्यावर या दोन्ही मुद्दय़ांवर अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी विधान परिषदेत दिले.
मराठा समाजास २५ टक्के आरक्षण देण्याची तसेच खुल्या वर्गातील जातींना आर्थिक निकषावर आधारित नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याची मागणी करत मराठा समाजातील सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकार गंभीर नाही. अन्य महापुरुषांच्या स्मारकासाठी  नियमांचे अडथळे दूर करण्यात आले. मग हाच नियम महाराजांच्या स्मारकासाठी का लावला जात नाही, असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. यासंदर्भात सभापतींनीच आपल्या दालनात या विषयावर बैठक  बोलवावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मत सभापती देशमुख यांनी व्यक्त केले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 7:21 am

Web Title: maratha reservation matter will be sattled in winter session
टॅग Reservation
Next Stories
1 आता शाहू मिल स्मारकांसाठी जागेचा हट्ट वाढला
2 वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्याची मागणी
3 जिल्हा बँकेतील वादग्रस्त विषयांवरील निर्णय कोरमअभावी लांबणीवर
Just Now!
X