News Flash

“ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीये ना”

भाजपाचा काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांना सल्ला; ''नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा' महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!"

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

करोनाचं संकट ओसरत असून, थोडासा दिलासा मिळालेल्या ठाकरे सरकारसमोर एक नवं आव्हान उभं राहताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानं हा मुद्दा राज्यात ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रभर दौरा आणि राजकीय नेत्यांच्या प्रमुखांच्या भेटीचा कार्यक्रम हाती घेतला असून, दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्या राजकीय संघर्षांच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधत काँग्रेसच्या प्रवक्त्यांना सल्ला दिला आहे. “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल,” असा टोलाही भाजपाने लगावला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. मात्र, भेटीसाठी वेळ न दिल्यानं राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला आव्हान दिलं. “कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांना व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू,” असं सावंत म्हणाले होते.

प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का?; स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेस नेत्याचा सवाल

सावंत यांनी दिलेल्या आव्हानाला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. दरेकर यांनी ट्विट केलं असून, शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. “ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात!,” असं दरेकर म्हणाले.

“बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!,” असा इशाराही प्रविण दरेकर यांनी सचिन सावंत यांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 2:47 pm

Web Title: maratha reservation news pravin darekar sachin sawant uddhav thackeray sambhajiraje bhosale bmh 90
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ही केवळ अफवा, नवाब मलिकांचा खुलासा
2 Maharashtra Lockdown: लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले….
3 चिमुकल्यांच्या बचावासाठी ठाकरे सरकार सज्ज; तिसऱ्या लाटेसाठी विशेष टास्क फोर्स
Just Now!
X