X

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचे ६ महिन्यात काम सुरू होणार – बबनराव लोणीकर 

मराठावाड्याचा दुष्काळ दुर करण्यासाठी दोन वर्षापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प राबण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष काम कधी सुरूवात होणार यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. परंतू येत्या चार महिन्या प्रकल्पाचा डीपीआर तर सहा महिन्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्यची घोषणा ना.बबनराव लोणीकर यांनी गुरूवार दि.६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
या योजनेला ५० हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असून याव्दारे मराठवाड्यातील १६ धरणाचे वॉटर ग्रीड करण्यात येणार आहे. तसा राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी माहिती दिली आहे
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाव्दारे देण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१६-१७ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गुरूवार दि.६ रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बबनराव लोणीकर बोलतांना म्हणाले की, गेल्या दोन वर्षापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबवण्याची घोषणा केली होती. या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या खात्याने अभ्यास करण्यासाठी इस्रायील, श्रीलंका,गुजरात, तेलंगाणा येथे करण्यात आलेल्या वॉटर ग्रीड प्रकल्पाचा दौरा करून मराठवाड्यात कशा प्रकारे प्रकल्प राबवण्यात येईल याचा अभ्यास केला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या चार महिन्या या प्रकल्पाचा डीपीआर मंजूर होणार असून सहा महिन्यात प्रत्यक्ष कामला सुरवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतू या संपुर्ण प्रकल्पाला किती खर्च येणार आहे आणि प्रत्यक्ष कामाला कुठून सुरवात होणार अशी माहिती अद्यापही समोर येणे बाकी आहे.
इस्रायलची शासकीय कंपनी घेतीली होती माहिती 
मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम करण्यासाठी इस्रायलमधील शासकीय वंâपनी मेकोरॉट या कंपनीने मार्च महिन्यात आढवा घेण्यासाठी मराठवाड्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी ‘डाटा’ कलेक्शन केला होता, तसेच कंपनी दोनसदस्यीय शिष्टमंडळाने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयल वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक घेऊन गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी यांच्या सोबत चर्चा करून इस्रायल मधील पाण्याच्या मूल्यमापनाबाबात पीपीटी व्दारे पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात होते.