‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेता मिलिंद दास्ताने यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’मधून मिलिंद यांनी २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन पैसे न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिलिंद दास्ताने सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये राणादाच्या वडीलांची म्हणजेच आबांची भूमिका वठवित आहेत.

औंधमधील आयटीआय रस्त्यावर ‘पीएनजी ब्रदर्स’चे सोने, चांदी दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानामध्ये निलेश दास्ताने हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. ४ मार्च २०१८ रोजी निलेश यांनी अक्षय गाडगीळ यांना फोन करुन आपल्या ओळखीतील मिलिंद दास्ताने हे दुकानात खरेदीसाठी आल्याचे सांगितलं. ते फोनवर म्हणाले की, ‘ मिलिंद यांनी तीन हजार ८८५ रुपये किंमतीचे जुने सोन्याचे दागिने देऊन दुकानातून त्या बदल्यात चार लाख ९२ हजार रुपये किंमतीचं सोनं खरेदी केलं आहे. बाकीचे पैसे चुकते करण्यासाठी त्यांच्याकडे दोन चेक दिलेत. पण ज्यावेळी मी सांगेन त्याचवेळी चेक बँकेत जमा करण्याचे मिलिंद यांनी सांगितलेय.’
त्यामुळे बरेच दिवस मिलिंद यांनी दिलेले चेक बँकेत जमा करण्यात आले नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा ११ मार्च रोजी मिलिंद दुकानात खरेदीसाठी आले. त्यावेळी पूर्वी दिलेले चेक माघारी घेऊन दुसऱ्या बँकेचे चेक दिले. दोन्ही चेकपैकी एक चेक वटलाच नाही.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

त्यानंतर अक्षय गाडगीळ यांनी ‘मिलिंद दास्ताने यांना मी ओळखत नसून ते कोण आहेत?’, असा प्रश्न व्यवस्थापक निलेश याला विचारला. त्यावर मिलिंद दास्ताने हे मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे निलेश आणि मिलिंद यांची पूर्वीपासूनची ओळख असल्याचं गाडगीळ यांना समजलं.

दरम्यान, मिलिंद हे लवकरच सगळे पैसे व्याजासकट परत करणार असल्याचं निलेशने गाडगीळ यांना सांगितलं. त्यानंतर मिलिंद यांनी निलेशला आपल्या आईची डोंबिवली येथे जागा असून, व्यवहार चालू आहे. हा व्यवहार झाल्यानंतर तीन कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जेवढे सोने खरेदी करू, तेवढी रक्कम एकत्रित देऊ असेही सांगितले. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी पुन्हा दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण २५ लाख ६९ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. मात्र या खरेदीनंतर त्यांच्याशी संपर्क साधून निलेशने पैसे देण्याविषयी विचारणा केली असता, मिलिंद यांनी असमर्थता दर्शविली. याप्रकारानंतर गाडगीळ यांनी ठोस पावले उचलत मिलिंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.