News Flash

हिंदू धर्मियांना पटकन थंड होण्याचा एक रोग आहे – शरद पोंक्षे

"आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही"

हिंदू धर्मियांना पटकन थंड होण्याचा एक रोग आहे – शरद पोंक्षे

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी हिंदू धर्मियांना पटकन थंड होण्याचा एक रोग आहे अशी खंतही व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ‘आम्ही सर्व सावरकर’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचं ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. भाजपाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर टीका करताना काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत टीका केली आहे. तसंच दिल्लीमधील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला. “मला राहुल गांधी यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो,” असा उपहासात्मक टोला शरद पोंक्षे यांनी लगावला आहे.

आणखी वाचा – “काही मुलं गतिमंद असतात”, शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवर टीका

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मी त्यांना विनंती करतो की, सतत दीड दोन महिन्यांनी त्यांनी असंच विधान करत राहावं. त्याच्यामुळे काय होतं, हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही. मग अशी माणसं उपयोगी पडतात. ते तिकडं वेड्यासारखा बोलले की सगळ्यांच्या मनातील सावरकर, शिवाजी, राणा प्रताप, टिळक हे जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतंय का.. असं म्हणत व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणं अनेक ठिकाणी फिरतात. मग माझ्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही किती चांगली गोष्ट आहे”.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?
‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल”..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 3:40 pm

Web Title: marathi actor sharad ponkshe hindu veer savarkar congress rahul gandhi sgy 87
Next Stories
1 ‘भाई’चा बर्थडे यावर्षी पनवेलमध्ये नाही तर नव्या ठिकाणी होणार साजरा
2 अंडरटेकर पुन्हा WWEमध्ये परतणार?
3 ..म्हणून आजोबांच्या निधनानंतर न्यासा पार्लरमध्ये गेली होती; अजयने सांगितले कारण
Just Now!
X