चित्रपट रंगभूमी व मालिकांमधील हरहुन्नरी अभिनेता श्रीराम कोल्हटकर यांचे आज पहाटे निधन झाले. डोंबिवलीत राहून नाट्यसृष्टीत कार्य करणाऱ्या त्यांच्या वडिलांचे म्हणजे भालचंद्र कोल्हटकर यांचे काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’ आणि ‘करले तू भी मोहब्बत’ अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा अभिनय चतुरस्त्र होता. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसोबत हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे सहकालाकारही शोकाकूल झाले आहेत.

अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला. ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘आपला माणूस’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘एक अलबेला’, ‘उंच भरारी’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. तसेच त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिका आल्या, पण त्यातही त्यांनी आपली विशिष्ट शैली दाखवून दिली.