News Flash

अभिजीत बिचकुलेचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद ? जामीन न्यायालयाने फेटाळला

चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती

अभिजीत बिचुकले

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा खंडणी प्रकरणातील जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद झाला आहे. अभिजीत बिचुकले मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना २१ जून रोजी अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती.

अभिजीत बिचुकले यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी जामीन झाल्यावर पोलिसांनी खंडणी प्रकरणात त्यांना अटक केली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

‘बिग बॉस’मधून बिचुकलेंना हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अटक प्रकरण पथ्यावर, बिचुकलेंनी महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे

आज झालेल्या सुनावणीत सात वर्षांपूर्वी आरोपीवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. वेळोवेळी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदवल्या. बिचुकले यांचे तोंड आवरावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली.

बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढविली. या काळात आरोपीस पोलीस संरक्षण होते. तरीही त्यास या प्रकरणाचे वॉरंट बजवाले नाही अथवा ताब्यातही घेतले नाही. आरोपी आजही सातारा शहरात फिरत असतो. त्यामुळे तो फरारी होता हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे ठरत आहे. तरी आरोपीस जामीन द्यावा, असा युक्तिवाद ऍड.शिवराज धनवडे यांनी केला.

दरम्यान, सरकारी पक्षातर्फे ऍड मिलिंद ओक म्हणाले, ‘आरोपी हा कलाकार असून एका मालिकेत सध्या तो स्पर्धक आहे. त्याच्या करिअरचा विचार करून त्यास अटी शर्थीवर जामीन देण्यास हरकत नाही. तसेच त्याने संबधित मालिकेत स्पर्धक म्हणून खेळताना न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन व चालू असलेल्या प्रकरणांवर कोणतेही भाष्य करू नये, हे निर्बध ठेवावेत’.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 5:41 pm

Web Title: marathi big boss abhijit bichukale bail application rejected satara court sgy 87
Next Stories
1 ‘या’ क्रिकेटपटूला डेट करते सुनील शेट्टीची मुलगी
2 हिरोंच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले ३० सिनेमे – मल्लिका शेरावत
3 चीनमध्ये मराठमोळ्या अक्षयच्या ‘त्रिज्या’चा डंका !
Just Now!
X