19 September 2020

News Flash

सगळ्या बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य-मुख्यमंत्री

सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

संग्रहित छायाचित्र

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 3:58 pm

Web Title: marathi language is compulsory in all education boards says cm devendra fadnavis
Next Stories
1 MMRDA चे क्षेत्र विस्तारले; ठरावाला विधानसभेत मंजुरी
2 ‘बालभारती’चे गणित चुकलेच! ८४% वाचक म्हणतात, ‘नवीन पद्धतीने गणित सोप्पं होणे कठीण’
3 विधानभवन कँटीनच्या उसळीत चिकनचे तुकडे, ‘भेसळखोरांना जन्मठेप द्या’
Just Now!
X