News Flash

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’च्या निर्मात्याची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून ३८ वर्षीय कल्याण पडाल यांनी केली आत्महत्या

कल्याण पडाल

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. कर्करोगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतं. ते ३८ वर्षांचे होते. कल्याण पडाल यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूर इथल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पडाल यांना काविळही झाला होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याण पडाल यांच्या ‘म्होरक्या’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाची मोठी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या या सिनेमाची तारीख पडाल यांच्या आत्महत्येमुळे पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:37 pm

Web Title: marathi movie mhorkya producer kalyan padam commit suicide
Next Stories
1 …तर शिवसेनेत मोठी फूट पडेल, रामदास आठवलेंचा इशारा
2 पुणे : म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत, कसा व कुठे कराल अर्ज?
3 विधान परिषद निवडणुकीत आकडय़ांच्या खेळात शिवसेनेची कसोटी
Just Now!
X