वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याचा विचार मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या निर्णयाचे वाईत तीव्र पडसाद उमटले असून, नागरिक तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दरम्यान, वाईतील कार्यालय कुठेही हलविण्याचा प्रस्ताव नसल्याचे विश्वकोशाच्या सहायक सचिवांनी सांगितले.

मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम सन १९६० साली सुरु झाले. जागतिक विश्वकोशाच्या धर्तीवर मराठी भाषेत माहितीचा खजिना विश्वकोशाच्या माध्यमातून उभारण्याचा संकल्प आजही सुरु आहे.पूर्वी मुद्रित खंडाच्या माध्यमातून उपलब्ध असणारा विश्वकोश आता एका क्लिकवर व विश्वकोशाच्या अॅपवरही उपलब्ध आहे.

mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
Hearing on petitions related to Maratha reservation now before the full bench of the High Court
मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

विश्वकोशाचे काम गेली अनेक वर्ष वाईतून सुरु आहे. प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या प्रशस्त इमारतीत हे काम सुरु आहे. विश्वकोश कामकाज पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, विश्वकोशाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा अनुभव घेण्यासाठी तसेच विश्वकोशाच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी अनेक अभ्यागत व विद्वान वाईला येत असतात. सध्याचे असणारे येथील कार्यालय पुणे अथवा मुंबई येथे हलविण्याचा विचार मराठी भाषा विभागात सचिवस्तरावर सुरु असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरवातीला सोशल मीडियातून सुरु झाली. यावर वाई शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या अनुषंगाने वाईत तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. यानिर्णयात आंदोलन उभारण्यासाठी नागरिक, युवकांनी त्यांच्या स्तरावर बैठका सुरु केल्या आहेत. या निर्णयाची नुकतीच मंत्रिपदी आलेल्या सुभाष देसाई यांना काहीही कल्पना नाही. सचिव स्तरावर हा विचार सुरू असल्याचे समजते.

मराठी विश्वकोश कार्यालय वाईतून हलविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. याबाबत गैरसमजातून चुकीची माहिती पसरविण्याचे काम चालू आहे. आपण वाई येथे प्रज्ञापाठशाळा अथवा परिसरात प्रशस्त ईमारत तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी भवन मराठी विश्वकोश कार्यालय वाई यांच्या नावाने तयार करण्याचा यथार्थ प्रयत्न करतोय आणि काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. शासनाने असा कुठलाही निर्णय घेतला नाही.
डॉ. शामकांत बा. देवरे.
सहायक सचिव.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.