News Flash

मराठवाडय़ात ६५ ते ७० टक्के

मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पैसे वाटल्याच्या तक्रारी अनेक मतदारसंघांत होत्या.

| October 16, 2014 01:58 am

मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मंगळवारी रात्रीपासून पैसे वाटल्याच्या तक्रारी अनेक मतदारसंघांत होत्या. उस्मानाबाद मतदारसंघातील कळंब तालुक्यात एका केंद्रासमोर उघडपणे पैसे वाटल्याचा प्रकार समोर आला. नांदेडमध्येही पैसेवाटपावर वाद झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन शिवसैनिक जखमी झाले.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मंगळवारी रात्री शिवसेनेचे ३ कार्यकर्ते पैसेवाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यांच्या मोटारीतून ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले. या वेळी तिघांना अटक करण्यात आली. औरंगाबाद शहरात शांततेत मतदान झाले. सायंकाळी ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा किरकोळ प्रकार वगळता शहरातील तीनही मतदारसंघांत शांततेत मतदान झाले.
या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या परभणी जिल्ह्य़ात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. पाथरी येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. या वेळी हस्तक्षेप करणारा पोलीस कर्मचारी जखमी झाला. हिंगोली जिल्ह्य़ातही मतदानाच्या आदल्या दिवशी पैसेवाटप करण्याच्या तक्रारी होत्या. मंगळवारी रात्री नारायणनगर परिसरात मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ हजार ५४० रुपये जप्त करण्यात आले. जालना जिल्ह्य़ात मतदान शांततेत पार पडले. अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथे रस्ता व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने ९४६ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.  बीड जिल्ह्य़ात सरासरी ६५ ते ७० टक्के मतदान झाले. या जिल्ह्य़ात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडले.
िहगोली जिल्ह्यात ७० टक्के
पसेवाटपाचे ११ गुन्हे, दोन ठिकाणी यंत्र बंद
वार्ताहर, िहगोली
जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत सरासरी ७० टक्के मतदान झाले. िहगोली शहरात काही केंद्रांवर पसेवाटप करताना कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. िहगोली मतदारसंघात या प्रकरणी ११ गुन्हे दाखल झाले. दोन केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.
सायंकाळी पाचपर्यंत ३ मतदारसंघांत ६२.८८ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात ८ ते १० टक्के मतदान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. संध्याकाळी पाचपर्यंत वसमत तालुक्यात २ लाख ६३ हजार २२८पकी १ लाख ७१ हजार ४०३ मतदारांनी मतदान केले. त्याची सरासरी ६५.११ आहे. कळमनुरी मतदारसंघात २ लाख ८३ हजार ६७पकी १ लाख ७६ हजार ३७० मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६२.४५ आहे. िहगोली मतदारसंघात २ लाख ८६ हजार ५३१पकी १ लाख ७५ हजार ५१४ मतदारांनी मतदान केले. सरासरी ६१.२५ आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख ३२ हजार ८२६ पकी ५ लाख २३ हजार २८७ मतदारांनी मतदान केले. यात २ लाख ९० हजार २८० पुरुष, तर २ लाख ३३ हजार ४०७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पाचपर्यंत झालेल्या या मतदानाची टक्केवारी ६२.८८ होती.
रात्री विविध घटनांत दाखल गुन्ह्यांमध्ये विकास बाबुराव घुगे, प्रकाश शामराव घुगे, अनिल भाऊराव बांगर या तिघांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान शहराच्या नारायणनगर परिसरात मतदारांना प्रलोभन दाखवून पक्षाला मतदान करण्याचे सांगून, रोख १२ हजार ५४० रुपये मिळून आले. या प्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या एका ठिकाणी सिद्धार्थनगर येथे अमोल प्रकाश जमदाडे व अण्णाभाऊ साठेनगरात अन्य एकाला निवडणूक संबंधाने मतदानासाठी लोकांना प्रलोभन, आमिष दाखवून पसेवाटप करीत असल्याच्या कारणावरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. िहगोली शहरात मतदान सुरू झाल्यानंतर दोन गुन्हे दाखल झाले, तर सायंकाळी उशिरापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जालन्याच्या ५ मतदारसंघांमध्ये
सरासरी ६०-६५ टक्के मतदान
वार्ताहर, जालना
जिल्ह्य़ातील ५ मतदारसंघांत सरासरी ६० ते ६५ टक्के मतदान झाले. सकाळी पहिल्या दोन तासांत सरासरी ८.०९ टक्के मतदान झाले. जिल्ह्य़ात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या घनसावंगी मतदारसंघात या दोन तासांत सर्वाधिक १४ टक्के, तर परतूर तालुक्यात सर्वात कमी ३.६६ टक्के झाले.
सकाळी नऊनंतर मात्र परतूरमध्ये मतदानाचा वेग वाढला. मंठा, परतूर व जालना तालुक्यांतील १७ ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश असणाऱ्या परतूर मतदारसंघात दुपारी ११ ते १ या दरम्यान ८.१५ टक्के मतदान झाले. भोकरदन मतदारसंघातील जाफराबाद तालुक्यात १०० गावांमध्ये अकरापर्यंत २० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत जिल्ह्य़ातील सर्वाधिक ५९ टक्के मतदान भोकरदन मतदारसंघात झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष या मतदारसंघातून भाजपकडून उभे आहेत.
जालना मतदारसंघात सकाळपासून इतर ४ मतदारसंघांच्या तुलनेत मतदानाचा वेग कमी होता. सकाळी नऊपर्यंत ९.१७ टक्केच मतदान झाले. दुपारी एकपर्यंत या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ३४.६९, तर नंतर तीनपर्यंत ४४ वर पोहोचली. जालना मतदारसंघात पाचपर्यंत मतदानाची टक्केवारी ५१.४५ झाली होती. बदनापूर मतदारसंघात या वेळेपर्यंत ५९ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात समाविष्ट भोकरदन तालुक्यातील ६१ गावांमध्ये दुपारी तीनपर्यंत ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदान कमी गतीने होत होते.
देशगव्हाण गावामध्ये
चापर्यंत मतदान नाही
अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथील केंद्रावर दुपारी चापर्यंत कोणीही मतदान केले नव्हते. गावचा रस्ता आणि गारपीट झालेल्या शेतक ऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही, म्हणून या गावातील ९४६ मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. पाचपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ५८.७३ टक्के मतदान झाले होते.
खामगावमध्ये हाणामारी, राघूचीवाडीत बहिष्कार
उस्मानाबादमध्ये ६५ टक्के मतदान
वार्ताहर, उस्मानाबाद
जिल्ह्यातील चार मतदारसंघांमधील ५६ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी यंत्रबंद झाले. सायंकाळी पाचपर्यंत चारही मतदारसंघांत अंदाजे ६५ टक्के मतदान झाले. उस्मानाबाद मतदारसंघात २०, उमरगा १३, तुळजापूर १३ व परंडा मतदारसंघात १० उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले.
दरम्यान, उस्मानाबाद नगर परिषद हद्दीत समाविष्ट असलेल्या राघूचीवाडी गावाच्या विकासाकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले. गावात पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते, वीज व इतर सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, यासाठी येथील ग्रामस्थांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. गावातील मतदानकेंद्रांवर शुकशुकाट होता.
सरपंच-कार्यकर्त्यांत हाणामारी
उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच मनोगत ऊर्फ िपचू शिनगारे, तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. गावातील मतदानकेंद्रावर दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवसेनेचे कार्यकत्रे अमोल बोबडे व विश्वजित बोबडे यांना ‘मतदारांना एका उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन का करीत आहात?’ अशी विचारणा शिनगारे यांनी केली. त्यावरून तिघांमध्ये वाद झाला. या वेळी शिवसनिक व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात शिनगारे जखमी झाले. त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाण केल्याप्रकरणी शिनगारे यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कळंब, येडशीत मतदारांना पसेवाटप
कळंब शहर व उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मतदारांना पसेवाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदारांना पसे देऊन ठराविक चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:58 am

Web Title: marathwada 65 70 voting
टॅग : Marathwada
Next Stories
1 लातूरमध्ये पाचपर्यंत ६०.७२ टक्के
2 बीड जिल्ह्य़ात सरासरी ६५ ते ७० टक्के
3 पाथरीत काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धुमश्चक्री, पोलीस जखमी
Just Now!
X