मराठवाड्यात रविवारी दोन घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटना बीड आणि जालाना जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. बीडमधील धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथे शीतल बडे ( वय 37) व ओमकार बडे ( 14 ) या माय लेकराचा रविवारी दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. शीतल दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी दोन मुलांसह हरणमारी तलावावर गेल्या होत्या. सर्वात लहान मुलगा पाण्यात पडल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी शीतलने उडी घेतली. ती बुडत असल्याचे पाहून ओमकारने उडी घेतली. ते दोघे बुडाले पण सर्वात लहान मुलाला नजीकच्या एका व्यक्तीने वाचवले…

अन्य एका घटनेत जालान्यातील बाबूलतारा येथे दुधना नदीपात्राच्या डोगामध्ये दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. योगेश मुळे (वय १४) आणि शाम काळे (वय १३) मृत्यू झालेल्या विद्यार्थांची नावे आहेत. दोघे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आळ्याने शाम आणि योगेश यांचा बुडून अंत झाला. योगेश नववीमध्ये तर शाम आठवीमध्ये शिकत होता.