पावसाने दिलेल्या दग्यामुळे यंदा मराठवाडय़ातील खरीप पिकांचे उत्पन्न ५० टक्क्य़ांनी घटलेच, पण एरवी १७ लाख हेक्टर क्षेत्रावर होणारा रब्बीचा पेरा केवळ तीन लाख हेक्टरवर झाला. तोही पावसाअभावी वाया जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाचे उत्पन्नही घटणार आहे. हेक्टरी सरासरी २५ हजारांचे उत्पन्न गृहीत धरले, तर खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम मिळून एकटय़ा मराठवाडय़ाला बसणाऱ्या फटक्याचा आकडा १३ हजार कोटींवर जाणार आहे.
ऊस उत्पादक चरकात
या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दगा दिल्यामुळे ऊस उत्पादनातही मोठी घट झाली. परिणामी मराठवाडय़ातील निम्मे साखर कारखाने सुरूच होऊ शकले नाहीत. गतवर्षी औरंगाबाद व नांदेड विभागांतील उसाचे गाळप एक कोटी ३६ लाख टन झाले होते. या वर्षी सुमारे ३३ लाख टन गाळप कमी होणार आहे. एकंदर ऊस उत्पादकांचे ६६० कोटी रुपयांचे, तर कारखान्याचे ८४१ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.
द्राक्षबागा सुकल्या
लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हय़ांतील काही तालुके येथे मोठय़ा प्रमाणावर द्राक्षबागा आहेत.  लातूर जिल्हय़ातून तीन वर्षांपूर्वी २५० कंटेनर द्राक्ष निर्यात होत असे व त्यातून सुमारे १०० कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध होत असे. ते आता पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती लातूर जिल्हा द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनी दिली. द्राक्ष साठवणुकीसाठी शेतकऱ्यांनी १४ शीतगृहे कर्जे काढून उभारली; पण उत्पादनच कमी होत असल्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे, ही चिंता त्यांना सतावत आहे.  
फळबागा वणव्यात
नांदेड जिल्हय़ात केळीचे, तर परभणी व जालना जिल्हय़ांत मोसंबीचे उत्पादन होते. दोन्ही जिल्हय़ांत या वर्षी अनुक्रमे ४५ व ४६ टक्के पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी घटली आहे. परिणामी या हंगामात बागा जगवायच्या कशा, हा प्रश्न उभा राहणार आहे. या उत्पादनासही सुमारे ३०० कोटी

बाजार सुनासुना
या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मराठवाडय़ातील बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. दिवाळीत एरवी मोठय़ा प्रमाणावर कापड खरेदी केली जाते. यंदा तो व्यापार सुमारे ३० टक्क्य़ांनी घटल्याची माहिती लातुरातील कापड विक्रेते भरत हंचाटे यांनी दिली. अन्य बाजारांतही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते. मराठवाडय़ातील गावगाडय़ाचेच नव्हे, तर व्यापार-उद्योगाचे अर्थचक्रही कोरडय़ा मातीत फसले आहे..
या भागांतील बाजारपेठांत नोव्हेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात सोयाबीन येते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दोन लाख २४ हजार िक्वटलची आवक होती. या वर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये एक लाख नऊ हजार िक्वटल सोयाबीन आले. एकंदर उलाढालीत ५० टक्क्य़ांहून जास्त घट झाल्याचे लातूर येथील कीर्ती उद्योग समूहाचे अशोक भुतडा यांनी सांगितले.
कापसाची वाट
परभणी, जालना व बीड जिल्हय़ांतील काही भागांत कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या वर्षी उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारपेठेत निम्म्याच गाठी दाखल होत आहेत. परिणामी आडते, हमाल व व्यापाऱ्यांची उलाढाल गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. रुपयांचा फटका बसणार आहे.  
सोयाबीनही गेले
लातूर, उस्मानाबाद या भागांतील बाजारपेठांत नोव्हेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात सोयाबीन येते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दोन लाख २४ हजार िक्वटलची आवक होती. या वर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये एक लाख नऊ हजार िक्वटल सोयाबीन आले. एकंदर उलाढालीत ५० टक्क्य़ांहून जास्त घट झाल्याचे लातूर येथील कीर्ती उद्योग समूहाचे अशोक भुतडा यांनी सांगितले.
कापसाची वाट
परभणी, जालना व बीड जिल्हय़ांतील काही भागांत कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या वर्षी उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारपेठेत निम्म्याच गाठी दाखल होत आहेत. परिणामी आडते, हमाल व व्यापाऱ्यांची उलाढाल गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे.