डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्याकडून मंगळवारी या पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही नियुक्ती केली. डॉ. माने यांची राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदी निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. डॉ. गायकवाड रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक असून, गेल्या ८ ऑगस्टपासून परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून आपण कारभार करू. पारदर्शकता, गतिमानता व आयसीटी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर या त्रिसूत्रींचा अवलंब प्रशासनात करण्याची ग्वाही डॉ. गायकवाड यांनी या वेळी दिली. डॉ. माने यांनीही शिक्षण संचालकपदी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करू, अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2015 1:48 am