News Flash

अंगावर पत्नीचे फोटो चिटकवून पतीची आत्महत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना

गेल्या दोन महिन्यांपूर्वी पत्नी कार्यक्रमानिमित्त माहेरी गेली होती.

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील मोशी येथे माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने चक्क बायकोचे फोटो अंगाला चिटकवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास उघड झाली. रुपेश उत्तम जाधव (वय-२६) असं मयत विवाहीत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  एम.आय.डी.सी. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपेश उत्तम जाधव (रा.येराड वस्ती मोशी) आणि त्याची पत्नी हे दोघेच भाड्याच्या खोलीत राहात होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पत्नी कार्यक्रमानिमित्त माहेरी गेली होती, परंतु ती परत आली नाही तिला वारंवार संपर्क केला तरी पत्नी काही नांदायला येत नव्हती. अखेर सोमवारी भाड्याच्या राहत्या खोलीत किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करत रुपेशने आपली जीवनयात्रा संपविली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी पत्नीचा असलेला फोटो त्याने अंगावर चिटकवून आत्महत्या केली आहे. मयत रुपेशच्या अंगावर पत्नीचे दोन फोटो चिटकवले होते, तर सासू आणि सासऱ्याचे फोटो खाली पडलेले पोलिसांना आढळले आहे. या घटनेची माहिती घरमालकांनी पोलिसांना दिली होती. मोशी मधील लक्ष्मी नगर येथे मयत रुपेशचा भाऊ राहतो. माहेरी गेलेली पत्नी न आल्याने नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे हे करत आहेत.

आत्महत्येपूर्वी रुपेशने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले?-

रुपेशने आत्महत्येपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये चिकत्रिकरण केले होते,अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतु असं काही नसून रुपेशच्या मोबाईलला पासवर्ड आहे तो निघालेला नाही. तोपर्यंत केवळ अफवा असल्याचे एम.आय.डी.सी पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 12:15 pm

Web Title: married man suicide sticks wife photos to body and hangs himself
Next Stories
1 संत्र्यांना पुन्हा उच्चांकी भाव!
2 संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
3 संगणक अभियंत्यांच्या वाढत्या आत्महत्या
Just Now!
X