साताऱ्यातील कोपर्डे (ता खंडाळा) येथे विवाहितेच्या आत्महत्येनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कोपर्डे (ता.खंडाळा) येथील चंद्रशेखर शिंदे व मयुरी शिंदे हे एक दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरात येथील नवसारी येथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास होते. तर, सासरचे लोक मानपान तसेच सोने कमी दिले म्हणून २६ एप्रिल २०१६ पासून तिचा छळ करत होते. त्यामुळे तिच्या आत्महत्येस सासरे उत्तमराव शिंदे, सासु बेबी शिंदे , नवरा चंद्रशेखर शिंदे , दीर प्रशांत शिंदे, नणंदा संगीता भोसले, स्वाती काकडे मंगल कदम हे जबाबदार असल्याची तक्रार आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या काकाने पोलिसात दिली आहे, त्यावरून सासरच्या लोकांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

या विवाहितेचे माहेर बारामती तालुक्यातील असून तिने गुजरात येथे आत्महत्या केल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या रागातून माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्या दारातच अग्नी दिल्याने तणाव वाढत गेला. यावेळी नातेवाईकांमध्ये वादवादीचा प्रसंग उद्भवल्याने घटनास्थळी लोणंद पोलीस दाखल झाले होते.

यावेळी लोणंद पोलिसांनी शांततेने प्रकरण हाताळत दोन्ही बाजूकडील नातेवाईकांना शांततेचे आवाहन केल्याने वादावर अखेर पडदा पडला आहे. पुढील तपास लोणंद पोलिस करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे.