News Flash

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा 

विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी ही कारवाई केली.

(संग्रहित छायाचित्र)

गोंदिया : गोंडउमरी येथील गायत्री गंगासागर शिवणकर(३०) या विवाहितेने २० जानेवारीला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पती, सासू व सासरा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी ही कारवाई केली.

पळसगाव-सोनका येथील मनोहर राजाराम भेंडारकर यांची मुलगी गायत्री हिचे गावातील गंगासागर विठोबा शिवणकर यांच्यासोबत रितीरिवाजाने १८ मे २०१४ रोजी लग्न झाले. गंगासागर हे गुजरातमध्ये एका कंपनीत काम करीत असल्याने पत्नीला तेथे घेऊन गेला होता. २०१६ मध्ये प्रसूतीच्या कारणावरून पत्नीला गावी आई-वडिलांकडे आणून ठेवले होते. दरम्यान, २०१६ मध्ये पळसगाव येथील शेती व घर विक्री करून शिवणकर कुटुंब गोंडउमरी येथे स्थायिक झाले. यानंतर सासू-सासऱ्याकडून गायत्रीला त्रास दिला जात होता. मागील महिन्याभरापूर्वी गंगासागर हा गुजराजमधील नोकरी सोडून गावी आला. त्याने आईवडिलांच्या मदतीने गायत्रीला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देणे सुरू केले. यामुळे मानसिक तणावात असलेल्या गायत्रीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचे वडीलल मनोहर भेंडारकर यांनी मुलीच्या आत्महत्येस जावई गंगासागर ,सासरे विठोबा व सासू जवाबदार असल्याची तक्रार पोलिसात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:14 am

Web Title: married women suicide three crime news akp 94
Next Stories
1 स्नेहसंमेलनाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
2 पंढरपुरात रंगला विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा
3 अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार प्रकरणी जन्मठेप
Just Now!
X