रायगड जिल्हा ऐतिहासिकदृष्टय़ा पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा आहे. अलिबाग शहर हे पर्यटन क्षेत्र असून किल्ले, समुद्रकिनारे आकर्षक असल्याने येथे लाखो पर्यटक भेट देत असतात. त्याचप्रमाणे अलिबाग शहर कलाक्षेत्रातही अग्रेसर आहे. रायगड जिल्ह्य़ात मुख्यत्वे करून अलिबागमध्ये िहदी तसेच मराठी चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण मोठय़ा प्रमाणावर केले जाते. यामध्ये अलिबागचे कलाकारसुद्धा सहभागी होत असतात, मुंबई फिल्मस् कॉर्पोरेशनचा नवा उपक्रम पी.एन.पी. कॉलेजमध्ये ‘मस्तिया’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कॉलेजजीवनावर आधारित मंदार मधुकर पाटील यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या मुहूर्तासाठी शेकाप रायगड महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आणि कलाकार आदी उपस्थित होते. कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत मंदार मधुकर पाटील, विशाल गायकवाड, श्रेया घरत, श्रुष्टी साळवी आदी कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सागर यादव यांनी केले आहे. कॉलेजजीवनातील अनेक मजेशीर किस्से तसेच प्रेमप्रसंगाचे यामध्ये चित्रित केले आहेत. हा चित्रपट कॉलेजजीवनावर आधारित असून मित्र-मत्रिणींमधील दोस्तीच्या निरपेक्ष नात्यावर भाष्य करतो. कॉलेज लाइफमध्ये धम्माल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. चित्रपटामधून फ्रेश आणि नवीन कलाकार समोर येत आहेत. या वेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, कॉलेजजीवनावर आधारित, युवा पिढीला भुरळ घालणारा हा चित्रपट असल्याने हा चित्रपट सर्वाना नक्कीच आवडेल, या प्रसंगी कलाकारांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या.