News Flash

जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हाती घेतलं कमळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. (संग्रहित छायाचित्र)

सत्ताधारी शिवसेनेनं विरोध बाकांवरील भाजपाला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. या राजकीय घडामोडीला २४ तास लोटत नाही, तोच भाजपाने याचा वचपा काढला. भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.

भाजपा आणि एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपाला बुधवारी जोरदार धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रवेश केला. हा गिरीश महाजन आणि भाजपाला मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं दिलेल्या धक्क्याचा भाजपाने २४ तासांच्या आतच वचपा काढला. मुक्ताईनगरमध्ये खूश झालेल्या शिवसेनेची भाजपाने माथेरानमध्ये परतफेड केली. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांसह १० नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन तोडून भाजपाचे कमळ हाती घेतले.

आणखी वाचा- जळगावमध्ये शिवसेनेने धक्का दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. एकाच वेळी दहा नगरसेवकांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केल्यानं माथेरानमधील सत्ताचित्रच बदललं आहे. कोल्हापूरमध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भूमिकाही मांडली आहे.

आणखी वाचा- मुक्ताईनगरमधील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत

शिवबंधन तोडून भाजपात दाखल झालेले नगरसेवक

आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांनी भाजपात प्रवेश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:00 pm

Web Title: matheran 10 shivsena corporator joined bjp chandrakant patil kolhapur maharashtra bmh 90
Next Stories
1 भाजपाने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत -चंद्रकांत पाटील
2 जळगावमध्ये शिवसेनेने धक्का दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 अरेरे काळाने साधला डाव! ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज ठरली अपयशी
Just Now!
X