माथेरानमध्ये आजपासून पर्यटन महोत्सवाची धूम रंगणार आहे. २१ ते २५ मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझाइन ग्रीन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला माथेरान नगर परिषदेने मान्यता दिली आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांबरोबरच राष्ट्रीय आणि ११ देशांतील आंतरराष्ट्रीय कलाकारदेखील कार्यक्रम सादर करणार आहेत.
कलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम हे या ग्रीन फेस्टिव्हलचे वैशिष्टय़ आहे. टाकाऊ वस्तूंमधून शिल्पे तयार करण्यात येणार आहेत. विविध निसर्गशिल्प या निमित्ताने माथेरानचे सौंदर्य वाढविणार आहेत. कला व पर्यावरणाची सांगड घालणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार सहभागी होणार आहेत. निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे जागतिक कीर्तीचे लोक या माथेरान ग्रीन महोत्सवात सहभागी होणार आहेत. टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करून पर्यावरणाचे संतुनल कसे राखता येईल, याची माहिती दिली जाणार आहे