28 January 2021

News Flash

कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

संग्रहित छायाचित्र

कोरोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आता नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

चीनहून भारतात परतलेले तीन रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. अशात आता दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी सोमवारीच आली होती. देशात कोरोनाचे एकूण सात संशयित रुग्ण आहेत. आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर त्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होईल. सध्या नाशिकच्या या रुग्णावर उपचार सुरु कऱण्यात आले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळे दीर्घकाळ ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरकडे जाण्यास दिरंगाई करु नका. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, पाळीव प्राण्यांपासून दूर रहा असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 3:46 pm

Web Title: may corona virus first case in nashik scj 81
Next Stories
1 प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारीच प्रियकरासोबत पळाली
2 धक्कादायक : दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला
3 देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का
Just Now!
X