20 October 2020

News Flash

असे घडणार फ्यूचर मॅनेजर?; औरंगाबादमध्ये व्हॉटसअॅपवरून एमबीएचा पेपर लिक

'फ्युचर मॅनेजर' या नावाने व्हॉटसअॅप ग्रूप

MBA paper leaked through whatsapp group : वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएच्या प्रथम वर्षाचा अकाऊंटिंगचा पेपर सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी परीक्षा केंद्रात असलेल्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉटसअॅपवरून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठवली. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी 'फ्युचर मॅनेजर' या नावाने व्हॉटसअॅप ग्रूप तयार केला होता.

औरंगाबादमध्ये सोमवारी एमबीएचा (मास्टर इन बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन) पेपर फुटल्याची घटना समोर आली. तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना व्हॉटसअॅपवरून हा पेपर पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. यानंतर विद्यापीठाने अकाऊंटिंगचा पेपर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.

सिडको परिसरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एमबीएच्या प्रथम वर्षाचा अकाऊंटिंगचा पेपर सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी परीक्षा केंद्रात असलेल्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉटसअॅपवरून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठवली. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी ‘फ्युचर मॅनेजर’ या नावाने व्हॉटसअॅप ग्रूप तयार केला होता. परीक्षा केंद्रावरील शिपायांनी पेपर फोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सध्या परीक्षा नियंत्रक वसंतराव नाईक महाविद्यालयात दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे परीक्षार्थी वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात जमले आणि त्यांनी पेपरच रद्द करण्याची मागणी केली. अखेर विद्यापीठाने ही मागणी मान्य करत आजचा पेपर रद्द केला आहे. याशिवाय, या प्रकरणात गुंतलेल्या देवगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथील शरद पवार पॉलिटेक्निक महाविद्यालयातही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 1:28 pm

Web Title: mba paper leaked through whatsapp group in aurangabad
Next Stories
1 नववर्षांचे जल्लोषात स्वागत..
2 नांदेडच्या गुरुद्वारा मंडळाचे ६१ कोटींचे कर्ज माफ करू
3 ‘जामीन मिळूनही आर्थिक स्थितीमुळे कैदी तुरूंगात’
Just Now!
X