News Flash

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे मेधा पाटकरांचे आश्वासन

सरकार, न्यायालय आणि लोकशाही मार्गाने अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दे

अरुणा प्रकल्पग्रस्तांचा न्यायालयीन लढा लढणारे मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट   आशिष गिरी यांनीही या वेळी चर्चेत सहभागी होत प्रकल्पग्रस्तांची बाजू पाटकर यांच्यापुढे मांडली.

नर्मदा बचाव जनआंदोलनाची राष्ट्रीय उच्चस्तरीय समितीने वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाला भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सरकार, न्यायालय आणि लोकशाही मार्गाने अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले.

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या ‘लढा संघर्षांचा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा’ या संघटनेच्या वतीने पाटकर यांची मुंबईत भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांची कैफियत त्यांच्यासमोर मांडताना संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे म्हणाले की, आधी पुनर्वसन मग धरण, या तत्त्वाचे उल्लंघन करत कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता धरणाची घळभरणी करण्यात आली. मोबदला नाही, निवासी भूखंड नाही, पर्यायी शेतजमीन, नागरी सुविधांचा पुनर्वसन या गोष्टींची पूर्तता केलेली नाही. धरणाला कालवे नसताना  पाणीसाठा करून प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्यात बुडवण्यात आली. केवळ वरिष्ठांच्या वरिष्ठांची शब्बासकी मिळवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी घळभरणी केली. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेले सहा महिने प्रकल्पग्रस्त विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत.मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रकल्पग्रस्तांची कैफियत ऐकल्यानंतर पाटकर यांनी, सर्व घटनेची वस्तुनिष्ठ पहाणी करण्यासाठी  नर्मदा बचाव आंदोलन, जन आंदोलनाची राष्ट्रीय समिती आपल्या गावी येईल. अरुणा प्रकल्प, पुर्नवसन व बुडालेल्या घरांची वस्तुनिष्ठ अहवाल समिती सादर करेल आणि त्यानंतर सरकार, न्यायालय आणि लोकशाही मार्गाने अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:04 am

Web Title: medha patkar promises to bring justice to the project victims abn 97
Next Stories
1 भाजपवर नाही, तर फडणवीस यांच्या निकटवर्तीयांवर नाराज – खडसे
2 एकनाथ शिंदे रमले गावात आणि शेतातही!
3 महाराष्ट्रात सीएए लागू करण्याचा प्रश्नच नाही, दोन मंत्र्यांचा विरोधी सूर
Just Now!
X