News Flash

कुख्यात गुंड गजा मारणे मेढा पोलिसांच्या ताब्यात

मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच खात्री पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे येथील कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणेला  जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी जेरबंद केला. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच खात्री पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी त्याच्यावर एमपीडिए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली होती. पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरार झाला होता.मागील दोन दिवसांपासून तो वाई महाबळेश्वर मेढा परिसरात आल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती.तो मेढा शहरात आल्यानंतर मेढा (ता जावळी) पोलिसांना सापडला. पुणे पोलिसांना हवा असणारा गजा मारणे घटनास्थळावरून फरार झाला होता. तो महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून फिरत असल्याची माहिती देखील समोर येत होती. मात्र आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सापळा रचत सहाय्यक जेरबंद केले.

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो थेट महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता.त्याच्या गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच गजा मारणे असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांना शरण येण्यास सांगण्यात आले यानंतर त्याला फिल्मी स्टाईलने पकडण्यात आले. त्याला आता पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:01 am

Web Title: medha police arrest gaja marne abn 97
Next Stories
1 ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध 
2 हापूसची पेटी ‘फक्त’ एक लाखात
3 शिक्षिकांच्या प्रशिक्षणाबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ
Just Now!
X