News Flash

मोठी बातमी! १० जूनपासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा; ठाकरे सरकारचा निर्णय

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

करोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीडीएस., बीएएमएस, बीयुएमएस, बी एचएमएस.,बीपीटीएच,बीओटीएच आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे,” अशी माहिती अमित देशमुख यांनी ट्विट करत दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 4:38 pm

Web Title: medical education minister amit deshmukh announce medical exams dates sgy 87
Next Stories
1 “उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का?”
2 पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय
3 “निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता…”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!
Just Now!
X