27 May 2020

News Flash

मिरजेतील डॉक्टरांकडून पोलिसांची वैद्यकीय तपासणी

डिजिटल थर्मामीटरचा वापर करून कर्मचाऱ्यांचे तापमान आणि रक्तदाब तपासण्यात आला.

‘आयएमए’ मिरजच्या वतीने बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.'

टाळेबंदीच्या काळात बंदोबस्तासाठी २४ तास रस्त्यावर तनात असलेल्या पोलिसांची गुरुवारी मिरजेतील डॉक्टरांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी केली. या वेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या रक्तदाबाची तपासणी करून अन्य काही त्रास होत आहे का, याची चौकशी आयएमएच्या डॉक्टरांनी केली.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिरज शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर, सचिव डॉ. राहुलसिंग चढ्ढा, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. सूर्यकांत व्हावळ, डॉ. शिवानंद कुलकर्णी, डॉ. अजय चौथाई आदी डॉक्टरांनी गुरुवारी सकाळी साडेआठपासून बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली.डिजिटल थर्मामीटरचा वापर करून कर्मचाऱ्यांचे तापमान आणि रक्तदाब तपासण्यात आला. महाराणा प्रताप चौक, जवाहर चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, मंगळवार पेठ आदी ठिकाणी ही तपासणी करण्यात आली.

या वेळी उप अधीक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते. आज ८० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या पैकी चार कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढला असल्याचे आढळून आले असून त्यांना पुढील तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉ. दोरकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:12 am

Web Title: medical examination of police from miraj abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू
2 Lockdown: मंत्रालयातून परवानगी घेऊन महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या उद्योजकावर कारवाई
3 दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Just Now!
X