News Flash

आ. सुरेश जैन यांना वैद्यकीय रजा मंजूर

घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी १६ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे.धुळे कारागृहात असणाऱ्या आ. जैन यांनी २१ जुलै ते २८

| July 20, 2014 04:28 am

आ. सुरेश जैन यांना वैद्यकीय रजा मंजूर

घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी १६ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे.धुळे कारागृहात असणाऱ्या आ. जैन यांनी २१ जुलै ते २८ ऑगस्ट २०१४ या कालावधीसाठी रजा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यास सरकारी वकील शामकांत पाटील यांनी हरकत घेतली. त्यानंतर विशेष न्या. आर. आर. कदम यांनी जैन यांना २१ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत रजा मंजूर केली. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वैद्यकीय रजेतही वाढ करण्यात आली आहे.
या काळात जैन यांच्या मुलांच्या नावे असलेल्या मुंबई येथील घरात धार्मिक अनुष्ठान होणार आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता आ. जैन कारागृहातून बाहेर पडतील. त्यानंतर सहा ऑगस्टला पुन्हा धुळे कारागृहात हजर होण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2014 4:28 am

Web Title: medical leave denied to suresh jain
टॅग : Suresh Jain
Next Stories
1 काँग्रेसने शब्द न पाळल्याने मंत्रिपदाचा राजीनामा देतोय !
2 सरस्वती यांचे साईबाबांविषयी वक्तव्य निराधार
3 ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मला सुटीवर पाठविले’
Just Now!
X