05 March 2021

News Flash

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० करण्याचा निर्णय

या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मे २०१५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे.

| August 4, 2015 03:49 am

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजेनतील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मे २०१५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी पदव्युत्तर पदविका व पदवीधारक अधिकाऱ्यांना अनुक्रमे तीन व सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्यासाठी ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यासह त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुलभ करून त्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र निवड मंडळाच्या माध्यमातून नियुक्त्या करण्यात येत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकारी, विशेषज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. तसेच रूग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2015 3:49 am

Web Title: medical office retirement age increase to 60 years
Next Stories
1 जिल्ह्य़ातील ६८८ ग्रा.पं.ची आज निवडणूक
2 ‘स्मार्ट सिटी’त नांदेडच्या समावेशास काँग्रेसचा आंदोलन करण्याचा इशारा
3 ‘दुष्काळामुळे राज्यभरातील ऊसउत्पादनात ३० टक्के घट’
Just Now!
X